loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली शहरातील पोस्ट गल्ली पेडणेकर ज्वेलर्स समोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी; पादचाऱ्यांची कसरत

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातील खोत गल्लीत गटाराचे बांधकाम सुरू असल्याने त्या गटाचे पाणी पोस्ट गल्लीतील पेडणेकर ज्वेलर्स समोरील रस्त्यावर उलटल्याने येथे पाणी साचले आहे. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत पुढे दापोली अर्बन बॅकेकडील भागात जावे लागल्याची घटना घडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली शहरातील पोस्ट गल्ली मार्ग हा महत्त्वाचा असा मार्ग आहे या मार्गावर साई हाॅटेल, पेडणेकर ज्वेलर्स, श्री. गोपाळकृष्ण पतपेढी, महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोली अर्बन बँक, दापोली तालुका पतपेढी आदीसह विविध महत्वाची दुकाने आहेत. अशा या मार्गावर पेडणेकर ज्वेलर्स समोरील रस्त्यावर पाणी साचले आहे त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टाईम्स स्पेशल

याचे प्रमुख कारण म्हणजे खोत गल्लीत गटाराचे बांधकाम सुरू आहे. त्या गटारातील सांडपाणी आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी यामुळे या ठिकाणी पाणी भरले. त्यामुळे येथून मार्गस्थ होताना गुडघाभर पाण्यातून रस्ता काटत सर्वांना जावे लागत होते. त्यामुळे विशेषतः कामानिमित्त आलेल्या तसेच पोस्ट गल्लीतील रहिवाशांची रस्त्याअभावी मोठीच गैरसोय झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg