loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली-खेड महामार्गावरील नशेमन कॉलनीजवळ मोरी खचली; मोठे भगदाड, तातडीच्या दुरुस्तीची मागणी

खेड (प्रतिनिधी) - दापोली-खेड महामार्गावरील नशेमन कॉलनी परिसरात रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेली मोरी (कल्व्हर्ट) खचल्याने मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या धोकादायक स्थितीमुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी संबंधित विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भगदाडाचा आकार आणखी वाढण्याची तसेच संपूर्ण रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा महामार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसामुळे कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत हे भगदाड न दिसल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाईम्स स्पेशल

स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. तसेच, जोपर्यंत कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी बॅरिकेड्स, धोक्याचे फलक आणि आवश्यक इशारा व्यवस्था तात्काळ उभारावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील रहिवासी आणि वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg