loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता नाही, तर मृत्यूचा सापळा! वावे गावाचा संपर्क तुटला; १.९६ कोटींच्या निधीसाठी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

खेड : तालुक्यातील मौजे वावेतर्फे खेड येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून सकाळची एसटी बससेवाही बंद झाल्याने गावाचा बाहेरील जगाशी संपर्क जवळपास तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. चंडिका माता ग्राम विकास मंडळ (रजि.), वावे गावठाणचे सल्लागार दिनेश रघुनाथ उतेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९६ लाख ७५ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र निधी मंजूर न झाल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गावात एखादा गंभीर आजारी रुग्ण, गर्भवती महिला किंवा आपत्तीग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिकेसह अत्यावश्यक सेवा पोहोचणे कठीण होऊ शकते. त्यामुळे भविष्यात एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

टाईम्स स्पेशल

ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार भास्कर जाधव, पालकमंत्री उदय सामंत आणि माजी आमदार रामदास कदम यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करून निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. आता आश्वासन नको, रस्ता हवा!, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. तातडीने निधी मंजूर करून रस्त्याचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. वावेकरांच्या संयमाचा अंत होत असून, रस्त्याच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg