loader
Breaking News
Breaking News
Foto

हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समिती सभा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष जन आरोग्य समिती अपूर्वा बारगोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांचे मार्गदर्शनाखाली जन आरोग्य समिती सभा पार पडली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा आणि सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. तसेच नवनियुक्त सदस्यांना जन आरोग्य समितीचे कार्यक्षेत्र, निधी, कार्य आणि कर्तव्य या बद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी सखोल माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हेदवी प्रा आ केंद्राची इमारत फार जुनी असल्याने अनेक अडचणी येत आहेत. इमारत निर्लेखन आणि नवीन इमारत बांधकाम विषयी चर्चा करण्यात आली. सध्या पावसाळा सुरू असल्याने आणि साथीच्या आजारावर आवश्यक औषदासाठा उपलब्ध करून ठेवण्याची सूचना बारगोडे यांनी दिल्या. तसेच श्वान, विंचू आणि सर्प दंशावरील लसी उपलब्ध ठेवण्याची सूचना देण्यात आल्या. प्रा. आ. केंद्रात प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करावा अशी चर्चा झाली. उपलब्ध निधी तसेच अन्य संसाधनांच्या मदतीने लोकांपर्यंत आरोग्याच्या दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुविधा देता येऊ शकतात याबाबत सविस्तर चर्चा,आणि योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी जन आरोग्य समिती सदस्य सचिव प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ.कौशल्य वेल्हाळ, सदस्य मंदार छत्रे, बी.जी.शेलार, पौर्णिमा संजय सोनावणे, मंगेश निंबरे, डॉ. मनोज पाटील, संदिप हळदणकर, निकिता कांबळे, पूजा शशिकांत माटल आणि प्रा आ केंद्राचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg