loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी : महिलांना घर सांभाळून स्वतःच आरोग्य देखील सांभाळण्यासाठी योग ही फार महत्वाची गोष्ट आहे. योग शिक्षक प्रशिक्षण केंद्रातून घडणारे शिक्षक समाजाला निरोगी जीवन जगण्याची दिशा देतील, असा विश्वास नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले. येथील फिटनेस योग फाउंडेशन आयोजित 100 तासांच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"स्वस्थ शरीर, शांत मन, सशक्त भारत" हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या फिटनेस योग फाऊंडेशनतर्फे 100 तासांचे योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. 30 जून ते 30 जुलै 2026 या कालावधीत जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे हे शिबीर होत असून शिबिरात योगासने, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद, एक्यूप्रेशर, मानसिक आरोग्य तसेच योग शिक्षक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवली जाणार आहेत. उत्तम समाज निर्माणासाठी उत्तम योगशिक्षक घडवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. जीवनात वेळ फार महत्वाची असून योगामुळे रोगावर अनुशासन मिळवणं प्राप्त होते.

टाईम्स स्पेशल

५ हजार वर्षांपूर्वी हे रहस्य लिहून ठेवले आहे. योग शिक्षक बनवण्यावर आमचा भर आहे‌. योग आपलं जीवन परिवर्तन करण्यासाठी असून भविष्यात शाळांमध्ये योग शिक्षकांची देखील गरज भासेल असं मत योग प्रशिक्षक शेखर बांदेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, नगरसेविका स्नेहा नाईक, योग प्रशिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस योग फाउंडेशन जिल्हाध्यक्ष शैलेश बांदेकर, महिला जिल्हाध्यक्षा रसिका सावंत, एकनाथ पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लातये यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg