loader
Breaking News
Breaking News
Foto

गृप ग्रामपंचायत कळंबणी बु. तर्फे गुणवंत विद्यार्थी, एकल माता सत्कार

खेड - गृप ग्रामपंचायत कळंबणी बु. चे आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच भगवान साळुंके यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत मार्फत गावातील 10 वी, 12 वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार, तसेच एकल महिलांचा सन्मान तसेच गावातील तिनही शाळेतील साधारण 80 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे स्पोर्ट्स ड्रेस वाटप असा तिहेरी कार्यक्रम दिनाक 30 जून 2026 रोजी कळंबणी बु. नं 1 शाळेत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात गावातील असंख्य एकल महिलांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भगवान साळुंके होते. या सुंदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भरणे गण पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, सरपंच संघटना अध्यक्ष दिनेश चव्हाण, उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य शिल्पा येरापले, विनया बापट, जोशी, हंबीर, यादव उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामस्थ अरुण महाडीक, माने महाराज, अविनाश येसरे, शिगवण तसेच तिन्ही शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, ग्राम विकास अधिकारी संदेश पवार, अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक संतोष चव्हाण यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg