loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडाळमध्ये ५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर

सावंतवाडी - सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुदधिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा, त्यामधून मिळणारे गुण, होणारे फायदे याविषयी शिबीरात मार्गदर्शन केले जाईल. मागील दहा वर्षे मुक्ताई ॲकेडमी जिल्ह्यातील शालेय विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीरे, स्पर्धा, इत्यादी उपक्रम घेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ॲकेडमीचे अनेक विदयार्थी - विदयार्थिनी शालेय आणि असोसिएशनच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त आहेत. मुक्ताई ॲकेडमीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार मिळाले आहेत. नाव नोंदणी आणि इतर माहितीसाठी कौस्तुभ पेडणेकर, मोबाईल क्रमांक ८००७३८२७८३ यावर संपर्क करायचा आहे. विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या शिबीरात सहभाग घेण्याचे आवाहन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg