loader
Breaking News
Breaking News
Foto

शिंदे शिवसेनेला लॉटरी, दोघांना केंद्रात मंत्रीपद

मुंबई - विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढची झेप घेत मार्गक्रमण सुरु केले आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात शिंदे शिवसेनेला लॉटरी लागली आहे. आता त्यांची संख्या वाढल्याने त्यांना दोन मंत्रीपद मिळणार आहेत. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. मागच्या १२ वर्षांपासून ते खासदार आहेत. आता ऑपरेशन टायगरमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांची महत्वाची भूमिका होती. पक्ष विस्तारासाठी सतत त्यांचे दौरे सुरु असतात. आता त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फुटलेल्या खासदारांपैकीही एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. फुटलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांचीच सर्वात जास्त चर्चा झाली. ओमराजे निंबाळकर यांचा तळागाळातील कार्यकर्ते, जनता यांच्याशी संपर्क आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्यावरच सर्वात जास्त टीका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर स्वत: ग्राऊंडवर उतरुन काम करतात. लोकांच्या प्रश्नाना भिडतात. त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्या रुपाने आणखी एका तरुण खासदाराला एकनाथ शिंदे मंत्रिपदाची संधी देतील अशी चर्चा आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg