loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड-भिंगळोली रस्त्यावरील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे; नागरिकांचा तीव्र संताप

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - मंडणगड शहर ते भिंगळोली या मार्गावर सुरू असलेल्या गटाराच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे समोर आले आहे. नुकतेच पूर्ण झालेले हे काम अल्पावधीतच ढासळल्याने प्रशासनाच्या कामावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ​या कामाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "गटाराचे काम ज्या पद्धतीने ढासळले आहे, त्यावरून या कामासाठी वापरलेल्या साहित्याचा आणि कामाच्या दर्जाचा अंदाज येतो," अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारी पैशांचा गैरवापर होत असतानाही नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवालही संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. ​कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि विरोधी पक्ष आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg