संगलट (खेड) (प्रतिनिधी) - दापोली नगरपंचायत हद्दीतील नागररबुडी येथील वॉर्ड क्रमांक १५ मधील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे साचलेला चिखल आणि माती यामुळे स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक रहिवाशांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. नागररबुडी येथील वॉर्ड क्रमांक १५ मध्ये जाणारा एकमेव रस्ता सध्या अत्यंत दुरवस्थेत आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती व चिखल साचला असून, पावसाचे पाणी साठून राहिल्याने रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे.
स्थानिक रहिवासी अभिजीत उद्धव महाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी सकाळी शालेय मुलांना सोडायला जात असताना त्यांची दुचाकी चिखलात रुतल्याने ते खाली पडले. यात त्यांना दुखापत झाली आहे. केवळ त्यांनाच नाही, तर सायकलवरून किंवा चालत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, वृद्ध नागरिकांना आणि महिलांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. या समस्येबाबत दापोली नगरपंचायतीकडे तातडीने तक्रार करण्यात आली आहे. "लवकरात लवकर घटनास्थळाची पाहणी करून रस्ता दुरुस्त करावा आणि साचलेली माती व चिखल काढून रस्ता सुस्थितीत करावा," अशी मागणी करण्यात आली आहे.
जर प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही झाली नाही, तर नाईलाजास्तव नागरिकांना चिखलात बसून जनआंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा रहिवाशांनी दिला आहे. या अर्जाची प्रत दापोलीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. आता प्रशासन यावर काय ठोस पावले उचलते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.























3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.