रत्नागिरी - रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक १५ व प्रभाग क्रमांक ४ मधील विकासकामांच्या मुद्द्यावर चांगलाच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक अमित विलणकर आणि केतन शेटये यांनी विकासनिधीच्या वाटपात जाणीवपूर्वक भेदभाव करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.नगरसेवकांनी सभागृहात सांगितले की, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्वतः दोन्ही नगरसेवकांना विकासकामांची यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामांची यादी नगर परिषदेकडे देण्यात आली. मात्र, त्या यादीतील एकाही कामाचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी नगरसेवक अमित विलणकर आणि केतन शेटये यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, "पालकमंत्र्यांनी स्पष्ट आदेश देऊनही नगर परिषद त्याची अंमलबजावणी करत नसेल, तर पालकमंत्र्यांपेक्षाही मोठा राजकीय निर्णय घेणारा नेता नगर परिषदेत कोण आहे?"अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी सभागृहात व्यक्त केली.प्रभाग क्रमांक १५ व ४ मधील नागरिकांना केवळ राजकीय मतभेदांमुळे विकासकामांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत, हा लोकशाहीतील समान न्यायाच्या तत्त्वालाच हरताळ फासणारा प्रकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नगर परिषदेने सर्व प्रभागांना समान न्याय देत विकासनिधीचे वाटप करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.या प्रकरणी आपण थेट पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे दोन्ही नगरसेवकांनी सभागृहात स्पष्ट केले.
दरम्यान, रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि विकासकामांपेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.