loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; सहकार मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन

रत्नागिरी जिल्ह्यात दिवंगत गोविंदराव निकम यांनी सहकाराची पायाभरणी केल्यानंतर डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने रुजला आहे, असे मत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसानिमित्त 'मराठा भवन' येथे आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि व्यवसाय वृद्धी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष जाधव म्हणाले की, केंद्र सरकारकडून सहकार कायद्याला नव्याने उजाळा देण्यात आल्यानंतर, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तसेच, केंद्रात शरद पवार मंत्री असताना त्यांनी कृषी व सहकार क्षेत्रासाठी केलेले मोठे कामही या भागात सहकार रुजण्यास कारणीभूत ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उत्कृष्ट काम करत आहेत. नाबार्ड, आरबीआय आणि सहकार विभागाकडून होणाऱ्या वार्षिक लेखापरीक्षणात बँकेचे कामकाज नेहमीच अव्वल दर्जाचे ठरले असून, कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीची बँक आघाडीवर आहे. शेतकरी वर्गासाठी सुरू असलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँक सातत्याने नवे उपक्रम राबवत आहे. ​याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी बँकेच्या कामगिरीचे कौतुक केले. सहकार क्षेत्राचा उल्लेख होताच सहसा पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले जाते, परंतु रत्नागिरी जिल्हा बँकेने सहकारी संस्थांना पूरक ठरेल असे मोठे काम करून दाखवले आहे. बँक आपल्या सभासदांना तब्बल ३० टक्क्यांपर्यंत लाभांश (डिव्हिडंड) देत आहे, हे तिचे मोठे यश आहे. जिल्ह्यात आज दोन हजारांपेक्षा जास्त सहकारी संस्था कार्यरत असणे, हा येथील सहकार विकासाचा जिवंत पुरावा आहे, असे ते म्हणाले.

टाईम्स स्पेशल

​याच मेळाव्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल जिल्हा बँक व इतर सहकारी संस्थांच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. शिंदे यांनी, आपल्या सरकारी नोकरीची सुरुवात आणि निवृत्ती दोन्ही रत्नागिरी जिल्ह्यातच झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. या कार्यक्रमाला बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हावणेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जनरल मॅनेजर समीर दळवी यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg