loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी येथील नदी किनार्‍यावर्‍यावील लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे वाहने नदीत जाण्याचा धोका

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी येथील नदी किनार्‍यावर पावसाळ्यात नदीचे पाणी रस्त्यावर येऊन वाहन धारकांना पाण्याचा अंदाज नसल्याने अनेक वाहने नदी पाञात गेली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसीपणामुळे जीव वाचले. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांनी नदी किनार्‍यावर लोखंडी रेलिंग बसवलेले होते, पण रस्ता करताना संबंधित ठेकेदाराने रेलिंग तोडून टाकले, पण या ठिकाणी सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्या नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहने नदी पाञात जाऊन अपघात होण्याचा धोका आहे. गोवा, दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर, मुख्य मार्ग असलेल्या साटेली भेडशी येथील नदीला पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी येते. पूर आला की हे पाणी रस्त्यावर येते. राञीच्या वेळी रस्त्यावर पाणी आले आणि अनोळखी वाहन धारक, किंवा पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्या वर्षी व त्या अगोदर, पर्यटक, तसेच कोंबडया वाहतूक करणारी वाहने नदी पाञात गेली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg