loader
Breaking News
Breaking News
Foto

झरे सरगवे पुनर्वसन येथील ख्रिस्ती बांधवांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच, कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावली

दोडामार्ग (प्रतिनिधी) - तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या सरगवे गावातील धरणग्रस्त यांचे झरे सरगवे दोन मध्ये पुनर्वसन करण्यात आले. या ठिकाणी ख्रिस्ती बांधवाना भूखंड दिले, घर बांधले रस्ता दिला. पण हा रस्ता काही जणांनी बंद केला तो खुला करण्यासाठी पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागकडे पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नाही म्हणून ख्रिस्ती बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी आरोग्य तपासणी दरम्यान कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावली हे लक्षात आले. डॉ. पाटील यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली पण जोपर्यंत संबंधित अधिकारी ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. संबंधित अधिकारी गायब झाले आहेत यामुळे उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg