loader
Breaking News
Breaking News
Foto

कोनाळकट्टा महावितरण उपकेंद्रात अनधिकृत प्रवेश; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील महावितरणच्या कोनाळकट्टा ३३/११ केव्ही उपकेंद्रात अनधिकृतपणे प्रवेश करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकावल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई करावी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनानुसार, १ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास तीन मद्यधुंद व्यक्तींनी कोनाळकट्टा उपकेंद्रात विनापरवानगी प्रवेश करून ड्युटीवरील कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

संबंधित व्यक्तीच्या वर्तणुकीमुळे उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg