loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर इन्सुली घाटातील धोकादायक झाडे तोडण्यास सुरुवात

बांदा (प्रतिनिधी) - इन्सुली घाट परिसरातील धोकादायक व जीर्ण झाडे तोडण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्यानंतर संबंधित विभागाने ही कारवाई हाती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसांपासून घाटातील अनेक मोठी व जुनी झाडे रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत होती. विशेषतः पावसाळ्यात या झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर नितीन राऊळ यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून धोकादायक झाडे हटविण्याची मागणी लावून धरली. अखेर प्रशासनाने याची दखल घेत आजपासून झाडे तोडण्याच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात केली. या कामामुळे भविष्यात अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार असून, इन्सुली घाटमार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. प्रशासनाने उर्वरित धोकादायक झाडेही लवकरात लवकर हटवावीत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg