loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आपल्या मनोगतातून डॉ. प्रमोद देसाई यांनी वसंतराव नाईक हे सर्वात जास्त कालावधीसाठी राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखतात. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतीसाठी विविध प्रकारच्या योजना त्यांनी आणल्या होत्या. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळून देणारे वसंतराव नाईक होते, असे सांगून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. आणि उपस्थित प्राध्यापकवृंद व वि‌द्यार्थी यांना वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. सौम्या चौघुले, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण व महावि‌द्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व वि‌द्यार्थांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg