loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जागतिक डॉक्टर दिनानिमित्त शृंगारतळी येथील डॉक्टरांचा सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने जागतिक डॉक्टर दिनानिमित्त शृंगारतळी येथील गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. जागतिक डॉक्टर दिनानिमित्ताने डॉक्टरांचा सत्कार म्हणजे निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय. यावेळी शृंगारतळी येथील विष्णुपंत पवार मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र पवार, डॉ. रुशिता राजेंद्र पवार, डॉ. रसिका बोले यांचा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील सर्व डॉक्टर रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते अधिक घट्ट आणि विश्वासू बनले आहे. यावेळी वर्षा पवार, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी सेना गुहागर ता. अध्यक्ष प्रसाद कुष्टे, शृंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, पत्रकार गणेश किर्वे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, दिलीप नार्वेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg