loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा सत्कार करून कृषी दिन साजरा

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सत्कार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिन हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी आपल्या शेतीतून उत्पादित होणारा शेतीमाल शृंगारतळी बाजारपेठमधील बाजार पूल मार्केट येथे विक्रीसाठी उपलब्ध करतो. अनेक शेतकरी भाजीपाला, विविध फळे, विक्रीसाठी या ठिकाणी येत असतात. याही शेतकऱ्यांचा सन्मान मनसेच्या वतीने करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, पत्रकार गणेश किर्वे, दिलीप नार्वेकर, विवेक जानवळकर, व्यापारी ह. भ. प. कमलाकर वणगे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg