loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना उत्तर रत्नागिरी उपजिल्हा संघटकपदी ॲड. आनंदराव भोसले यांची नियुक्ती

खेड - शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते खेड जामगे येथे ॲड.आनंदराव दौलतराव भोसले यांना शिवसेना उत्तर रत्नागिरी उपजिल्हा संघटक पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ (अण्णा) कदम, तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, स.तु.कदम, हशमत परकार, दाऊद हमदुले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नियुक्तीनंतर बोलताना ॲड.आनंदराव भोसले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत,“पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने शिवसेना नेते रामदासभाई कदम व राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्य करेन व उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा व जनहिताच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहीन,”असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

या नियुक्तीमुळे शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड.आनंदराव भोसले यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg