loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांना २०२३ च्या निर्णयानुसारच वाढीव मोबदला द्या! आमदार विक्रांत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

पनवेल :- विरार–अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २०२३ मध्ये झालेल्या निर्णयानुसार मोबदला देण्यात यावा, त्यामध्ये कात्री लावू नये, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांसंदर्भातील काही मुद्दे उपस्थित केले. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासन सकारात्मक असून त्यानुसार मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरु आहे व सदर विषय सकारात्मक विचाराधीन असल्याची माहिती उत्तराद्वारे दिली. त्यामुळे विशेषता रायगड मधील शेकडो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विरार–अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून त्याचा आजूबाजूच्या परिसराला मोठा फायदा होणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून या महामार्गाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. मध्यंतरी जमीन भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. विरार–अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी सन २०२३ मध्ये निश्चित करण्यात आलेली मोबदल्याची रक्कम आता कमी ठरण्याचे प्रस्तावित असल्याचे माहे एप्रिल २०२६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय? असल्यास, मागील काही वर्षांत भूसंपादनाच्या निश्चितीअभावी शेतकऱ्यांच्या जमिनीचे हस्तांतरण किंवा वापर प्रलंबित राहिल्याने त्यांना झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून शासन मूळ मोबदल्याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त ‘विलंब भरपाई’ देणार आहे काय? लोकहिताच्या प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नसताना, वाढीव मोबदल्याच्या मागणीऐवजी पूर्वीचे दर कमी केल्यामुळे बाधित शेतकरी व जमीन मालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

टाईम्स स्पेशल

प्रचलित बाजारभाव आणि वाढती महागाई विचारात घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर यापूर्वीचे दर कायम ठेवण्याबाबत किंवा त्यात वाढ करण्याबाबत तसेच या प्रकल्पातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि दर निश्चितीमधील संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर विशेष समिती नियुक्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, हे मुद्दे आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थित केले. या प्रश्नाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. सार्वजनिक प्रयोजनासाठी लागणाऱ्या खाजगी जमिनीच्या संपादनामध्ये जमिनीचे मूल्यांकन करताना प्राथमिक अधिसूचनेपूर्वीच्या एक वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहार वगळण्याबाबतचे शासन परिपत्रक उच्च न्यायालयाने रिट याचिका व इतर संलग्न याचिकांवरील २४ डिसेंबर २०२४ च्या आदेशान्वये रद्द केले असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg