loader
Breaking News
Breaking News
Foto

अलिबागकरानी अनुभवली सुरेल संध्याकाळ... जुन्या मराठी, हिंदी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

अलिबाग (वार्ताहर)- संगीत मनांचा ठाव घेत.. संगीत जे मनात रुंजी घालत.. गीत जे आपल्या ओठांवर सहज तरळत... असे गीतसंगीत जर कानावर पडले तर रसिक मंत्रमुग्ध झाल्या खेरीज राहत नाही, याचा अनुभव नुकताच अलिबागेत आला. एम .पी आयोजित आणि सिंगिंग स्टार्स संचलित गाणी मनामनातील हा जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा सुरेख आणि सुरेल नजराणा घेऊन आलेली संध्याकाळ अलिबागकरांनी अनुभवली. अलिबाग शहरात गेली वर्ष ‘करा ओके’च्या माध्यमातून अनेक कार्यक्रम पार पडले. या मध्ये विशेषतः जुन्या, नव्या हिंदी चित्रपट गीतांचा अधिक समावेश होता. मराठी गीतांचे मोजकेच कार्यक्रम घेण्यात आले. एम. पी आयोजित गाणी मनामनातील या कार्यक्रमात देखील काही मोजक्याच हिंदी गीतांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमात अशा मराठी गीतांचा समावेश होता की, ती गाणी फार जुनी आणि क्वचितच कानावर पडत असतात. त्या मध्ये ‘‘काय बाय सांगू..कस ग सांगू.. तसेच लटपट लटपट, बुगडी माझी सांडली .. पदावरती जरातरीचा...बाई सुया घे ग.. दाभण घे...’’ या अवीट गोडीच्या गीतांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थित रसिक प्रेक्षकांनी ही गाणी ऐकून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या संगीत रजनीचा आस्वाद घेण्यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कॉंग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील थळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजिप सदस्य अमित नाईक,अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक तथा भाजपाचे नेते ऍड. अंकित बंगेरा, ऍड. विलास नाईक, साहित्यिक शरद कोरडे, निवृत्त नायब तहसीलदार श्रीकांत कवळे, संगीतकार विक्रांत वॉरडे, प्रफुल थळे, केशव चांदोरकर, आदि उपस्थित होते. ख्यातनाम गीतकार ‘जगदीश खेबुडकर’ यांचे सुपुत्र ‘मुकुल खेबूडकर’ यांनी ‘‘ग साजणी..कुण्या नावाची..कुण्या राजाची..’’ हे गीत सादर करून आपल्या वडिलांच्या गीताला उत्तम न्याय दिला. ज्येष्ठ गायिका माधुरी नाईक यांनी गणेश वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत केला.

टाइम्स स्पेशल

रसिकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्या कडून मिळणारी दाद ही कार्यक्रमाची उंची वाढवत होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गाणारे बहुतांश कलाकार हे व्यावसायिक नव्हते तर हौशी कलाकार होते. त्यांच्याकडून सादर झालेली गाणी ऐकून अलिबागेत सुद्धा गायक घडत असल्याची प्रतिक्रिया विलास नाईक यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र बोराडे आणि सौ. आशा बोराडे यांनी केले. तर तांत्रिक बाजू साऊंड इंजिनिअर नेहा सतीश पानसरे, संदीप साठे यांनी सांभाळली. माधुरी नाईक, शलाका पंडित, समिधा कार्लेकर, मोनिका पाटील, शोभना राजपूत, सोनाली साळवी, सुप्रभा आरेकर, नीलम खरसनबळे, मानसी गावडे, ज्योती मयेकर, अंजली जोशी, नीला शेंबेकर, प्रीती पाटील, मंजुषा तेलंगे, संदीप सातारे, राजेंद्र बोराडे, सतीश पानसरे, संदीप साठे, धनाजी कांबळे, राजेद्र नरबेकर ,जगदीश राऊत, चिंतामणी मकू, निशिकांत नाखरे यांनी ही संगीत रजनी सुरेल केली. माधवी खेबूडकर आणि आशा बोराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg