loader
Breaking News
Breaking News
Foto

मसाले पिक लागवड माहिती आणि काळीमिरी लागवड करून कसोपमध्ये कृषी दिन साजरा

कृषिदिनानिमित्त कसोप गावामध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय,दापोली चे RHWE विद्यार्थी यांनी मसाले पिक लागवड संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन ग्रामोन्नती मंडळ इमारत,कसोप येथे केले होते. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ. के. व्ही. मालशे आणि डॉ.संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यादरम्यान विद्यार्थ्यांनी मसाले पिके काळीमिरी,जायफळ,दालचिनी,हळद आणि लाखीबाग प्रकल्प या विषयांवरती पूर्ण लागवडीची माहिती आणि मसाले पिकांचे महत्व तसेच मसाले पिके लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल आणि नारळ बागेमध्ये मसाले पिके हे आंतरपिक म्हणून कसे लागवड करू शकतो याबद्दल मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यानी कसोप गावातील शेतकऱ्यांना दिले. या दरम्यान गोकृपा अमृतम चे कल्चर देखील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

शेवटी काळीमिरी रोपांची लागवड उपस्थितांच्या हस्ते करून कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान कसोप गावातील ग्रामपंचात सदस्य रेणुका आग्रे,साक्षी चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र साळवी,ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष राहुल साळवी आणि तसेच आजच्या दिवसाचा महत्वाचा भाग म्हणजेच शेतकरी वर्ग, ग्रामस्थ आणि RHWE चे ११ विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg