खेड - मंडणगड तालुक्यातील शेनाळे-बर्गेवाडी येथे ३० जून रोजी घडलेल्या खूनप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असली, तरी तपास सर्व बाजूंनी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात सदु सखाराम मोकाशी (वय ४२) यांचा डोक्यात दगड मारून खून झाल्याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०) याला अटक केली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पोलीस फिर्यादीनुसार, मयत आणि आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता.
त्यानंतर झोपेत असलेल्या सदु मोकाशी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विजय सिताराम काते यांनी फिर्याद दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी विजय सिताराम काते यांच्या नावावर यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, खेड आणि दापोली पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती सार्वजनिक नोंदींमधून समोर आली आहे. उपलब्ध नोंदींनुसार, २०२० ते २०२२ या कालावधीत चोरी, वन कायद्याचे उल्लंघन, खंडणी, धमकी, महिलांशी संबंधित गुन्हे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. तथापि, संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल असणे म्हणजे ती व्यक्ती दोषी असल्याचे मानता येत नाही. प्रत्येक प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयाकडून दिला जातो.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या खूनप्रकरणाचा तपास केवळ फिर्यादीतील माहितीपुरता मर्यादित न ठेवता, घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संबंधित व्यक्तींचे संबंध आणि इतर सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी. तपासात नवीन माहिती समोर आल्यास त्यानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.ङ्गमंडणगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले असून, उपलब्ध पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे निष्पक्ष चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खुनामागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.ङ्गया घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, कोणालाही अभय न देता सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणार्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.












































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.