मालवण (प्रतिनिधी) - रोटरी क्लब मालवणच्या वतीने मालवण भरड येथील 'श्री शिवाजी वाचन मंदिर' या संस्थेला आधुनिक संगणक संच भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे वाचनालयाच्या डिजिटलायझेशनला आणि प्रशासकीय कामाला मोठी मदत होणार आहे. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत या संगणकाचा रीतसर शुभारंभ करण्यात आला.
रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत वाचनालयाला अत्यंत आवश्यक असणारे हे साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. दिघे यांनी रोटरी क्लबचे विशेष आभार मानले. याप्रसंगी रोटरी क्लबचे पदाधिकारी महादेव पाटकर, प्रदिप सामंत, सुहास ओरसकर, प्रविणा शिंदे, पंकज पेडणेकर आणि अभय कदम तसेच श्री शिवाजी वाचन मंदिर संस्थेच्या वतीने कार्यवाह श्रीधर काळे, विजय अटक, वैदेही जुवाटकर, मानसी दुधवडकर, आणि साक्षी सावंत आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.