देवळे (प्रकाश चाळके) - दाभोळे जिल्हा परिषद गटातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी एका विशेष प्रभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम सभापती विलास चाळके यांनी या सभेत विविध खात्यातील समस्यांबाबत सखोल चर्चा केली व पाठपुरावा केला. दाभोळे जिल्हा परिषद शाळा नं १ येथे एका विशेष प्रभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी विलास चाळके यांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल जिल्हा परिषद गटातील जनतेचे आभार मानले. या बैठकीला रिक्त शिक्षक आणि ग्रामसेवक पदांचा प्रश्न मांडण्यात आला. ज्या गावांमध्ये हे पदे रिक्त आहेत ती तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.
शेती आणि भाजीपाला याना माकडांपासून होणार्या प्रादुर्भावाचा विषय मांडण्यात आला. त्यावर उत्तर देताना विलास चाळके यांनी हा विषय आमदार किरण सामंत यांच्याकडेही मांडण्यात आल्याचे आणि त्यावर उपाय म्हणून वनविभागाकडून सापळे लावण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. सध्या बहुतांश गावांमधील सरपंच आणि सदस्यांची मुदत संपली आहे. तिथे सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी त्यांना दिलेले अधिकार अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे गावातील अनेक कामे आणि प्रश्न प्रलंबित आहेत. तरी प्रशासकांना सरपंचांप्रमाणेच अधिकार द्यावेत अशी मागणी सरपंचातर्फे करण्यात आली. दाभोळे, कनकाडी, मेघी गावचे कृषि सहाय्यक यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा त्या गावातील ग्रामस्थांनी वाचला. हे कृषि सहाय्यक कधीच गावात येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे कोणत्याही योजना शेतकर्यांना समजत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शेतीचा हंगाम, नवीन लागवड या बाबत माहिती शेतकर्यांना कशी मिळणार असा प्रश्न ह्या गावातील शेतकर्यांनी मांडला.
या सभेला परिवहन खात्याचे कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गावागावातून बंद झालेल्या एस.टी. फेर्या, अनियमित वेळेवर धावणार्या एसट्या, त्यामुळे विद्यार्थीवर्गाची होणारी प्रचंड गैरसोय याची उत्तरे कोण देणार असा प्रश्न उपस्थितांनी विचारला. या प्रभाग सभेला पंचायत समिति विस्तार अधिकारी शंकर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रजनी चिंगळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे बापू शिंदे, माजी सभापति जयसिंग माने, पुर्ये गावाचे उपसरपंच बापू लोटणकर, पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये, पंचायत समिती सदस्या दीपाली जाधव, राजेश प्रत्याणे आदि उपस्थित होते.












































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.