दापोली(प्रतिनिधी)- दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ’, दापोली अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालयामध्ये, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ‘बांबू प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत ‘बांबू लागवड, व्यवस्थापन, प्रक्रिया व मुल्यवर्धन’ या विषयावरील ६ महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, प्रत्येक बॅचमध्ये १० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमामध्ये बांबूच्या विविध जातींची ओळख, रोपणनिर्मिती, लागवड, संगोपन, व्यवस्थापन, काढणी, विपणन, प्रक्रिया, अगरवत्ती निर्मिती, बांबू, फर्निचर, हस्तकला, बांबूपासून तयार होणारी खाद्य पदार्थ तसेच मॅट बोर्ड निर्मिती इत्यादी विषयांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत पुढील ५ वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी ‘पितांबरी प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक ‘रविंद्र प्रभूदेसाइर्’ यांनी स्विकारली आहे. या अनुषंगाने मंगळवारी ३० जून २०२६ रोजी कुलगुरु ‘डॉ. संजय भाव’े यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ’, दापोली आणि ‘पितांबरी प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक ‘रविंद्र प्रभुदेसाइर्’ यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न झाला.
या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ, कुलसचिव उमेश चांदिवडे, पितांबरी प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पुजारी, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, निम्नस्तर कृषि शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष वरवडेकर, कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. मंदार खानविलकर आदी उपस्थित होते.












































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.