मुंबई/ ठाणे/अलिबाग /रत्नागिरी/सिंधुदुर्ग ( टाइम्स ब्युरो) : गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई ठाणे सह कोकणात सर्व प्रमुख नद्यांना पूर आल्याने नदी काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातून घाटावर जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. सर्व प्रमुख घाट प्रवास करण्यासाठी धोकादायक म्हटले जात आहे. दरड केव्हाही कोसळेल अशी भीती असल्याने शक्यतो प्रवास करणे टाळा असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुंबई शहरात सर्वत्र पाण्याचा संचार सुरू आहे.
मुंबईतील सखल भागात पाणी भरले आहे, पालघर ठाण्यामध्ये ही मुसळधार वृष्टी सुरू आहे , कोकणातील सर्व समुद्रकिनारे लाटांच्या तडाख्यात असून मासेमारी करण्यासाठी मच्छीमाऱ्यांनी समुद्रात किंवा खाली भागात जाऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. खेडच्या जगबुडी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे तर चिपळूणची वाशिष्टी नदी दुतर्फा भरून वाहू लागली आहे. संगमेश्वर बावनदी व रत्नागिरीच्या काजळी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. मुचकुंडी नदीलाही महापूर आला आहे. नदी काठावरील शेतीमध्ये पाण्याने शिरकाव केला आहे. लाखो एकर शेती लागवडी पूर्वीच पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.
आणखी सलग तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे प्रशासनाने म्हटले आहे, अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना करण्यात आली आहे. मुंबई से कोकणात आजही समुद्राच्या लाटा उसळणार आहेत, डोंगर भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सजग राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कोकणातील भात शेतीला पूरक पाऊस पडत असला तरी अतिवृष्टीमुळे भात शेतीचे काम थंडावले आहे. शेतात पाण्याचा संचार झाल्याने पेरलेले भात पीक पाण्यात आहे, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.




















































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)






















































































1.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.