loader
Breaking News
Breaking News
Foto

उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा; बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा प्रयोग

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषि विभाग, गुहागर आणि ग्रामपंचायत उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने उमराठ येथे १ जुलै रोजी 'कृषिदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून बचत गटाच्या माध्यमातून तब्बल १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, नेत्राताई ठाकूर, पं. स. सदस्य संदिप गोरीवले, गौरव वेल्हाळ, मानसी रांगळे आणि उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांची प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. कृषिदिनानिमित्त उमराठ ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. आधुनिक व सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना 'गोकृपा अमृतम' तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक याप्रसंगी करून दाखवण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे व जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले. तसेच, गावातील बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक शेतावर नाचणी आणि विविध फळभाजी पिकांच्या लागवडीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर, कृषि अधिकारी कृष्णदेव कदम, मंडळ कृषि अधिकारी नाले, सर्जेराव कांबळे, मंगेश पिंगळे, विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, कृषि पर्यवेक्षक कुसाळकर यांच्यासह सर्व सहाय्यक कृषि अधिकारी उपस्थित होते. तसेच स्थानिक ग्रामस्थ अनिल पवार, भिकु मालप, शांताराम गोरीवले, संदीप गावणंग, विनायक कदम, नारायण गावणंग, महात्मा गांधी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा गोरीवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ मानकरी यांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी मांडली, तर सूत्रसंचालन उमराठचे ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश लेंडवे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg