loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकिवली जिल्हा परिषद गटातील वस्तीच्या एसटीच्या गाड्या केव्हाही बंद होणार नाहीत तालुकाप्रमुख सचिन धाडवे

खेड - सायंकाळी ६.३० वाजता वडगाव खुर्द येथे खेड–वडगाव एस.टी.च्या वस्तीच्या गाडीवरील चालक व वाहक यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विभागप्रमुख महिपत घोलप, संपर्कप्रमुख महेशराव मोरे, विभागीय सचिव दिलीप साबळे, शाखाप्रमुख महादेव मोरे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी चालक व वाहक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही सचिनजी धाडवे यांनी दिली. तसेच एस.टी. कर्मचारी व प्रवाशांच्या हितासाठी शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg