loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषि महाविद्यालय सांगुळवाडी यांच्या वतीने लोरे नं 2 येथे कृषी दिन साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) - कृषि दिनानिमित्त कृषि महाविद्यालय, सांगुळवाडी यांच्या वतीने लोरे नं 2 कृषी दिन साजरा. कृषि दिनानिमित्त "अझोला कल्चर प्रदर्शन व कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषिदूतांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, याबाबत मार्गदर्शन केले. वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, तालुका कृषि अधिकारी निरंजन देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सिद्धी रितेश सुतार लोरे नं. २ चे प्रशासक विलास शिवराम नावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालय, सांगुळवाडीचे प्राचार्य डॉ. एस. सी. होळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. आर. धोपट प्रा.ए.स.साबळे, प्रा.अ.देवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत विशाल दरेकर, प्रथमेश खराडे, विराज पाटकर, प्रज्वल खेडकर, विश्वजीत भुजबळ, तेजस काटकर, यश रोचकरी आणि अवधूत चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमास शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी यंत्रे-अवजारे व अझोला संवर्धनाच्या प्रात्यक्षिकांद्वारे शाश्वत व प्रगत शेतीचा संदेश देण्यात आला.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg