loader
Breaking News
Breaking News
Foto

कसबा प्रभाग समितीच्या बैठकीवर गोपनीयतेचा आरोप; ग्रामस्थ व तक्रारदारांना निमंत्रण नसल्याने नाराजी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची सभा शुक्रवार, ३ जुलै रोजी आंबेड येथील कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेसाठी ग्रामस्थ, तक्रारदार तसेच ग्रामपंचायत सदस्यांना निमंत्रण अथवा माहिती देण्याबाबत कोणतीही सूचना नसल्याने मतदार आणि विरोधकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचायतसमिती देवरुख संगमेश्वर कार्यालयाकडून प्रभागातील ग्रामपंचायत कार्यालयांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार सरपंच, प्रशासक, उपसरपंच तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रा. पं सदस्य, संबंधित तक्रारदार किंवा सर्वसामान्य ग्रामस्थांना सभेची माहिती देण्याबाबत पत्रात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रभाग समितीच्या बैठकीत ग्रामस्थांच्या विकासकामांवरील तक्रारी, प्रलंबित प्रश्न तसेच विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे या बैठकीत नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणे अपेक्षित असताना त्यांना निमंत्रणच नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "ही सभा लोकप्रतिनिधी, सरपंच आणि अधिकारी यांच्यामध्येच गोपनीय पद्धतीने होणार आहे का? नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना संबंधित तक्रारदारांनाच दूर ठेवण्यामागचे कारण काय?" असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

टाईम्स स्पेशल

लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. विकासकामांबाबत पारदर्शकता राखण्यासाठी प्रभाग समितीच्या बैठकीची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवून इच्छुक नागरिक व तक्रारदारांना उपस्थित राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, ३ जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीत नागरिकांना प्रवेश दिला जाणार का आणि बैठकीतील निर्णय सार्वजनिक केले जाणार का? याकडे आता संपूर्ण कसबा प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg