loader
Breaking News
Breaking News
Foto

ख्रिस्ती बांधवांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात बसपाचे दीपक जाधव आक्रमक

दोडामार्ग: दोडामार्ग येथील ख्रिस्ती बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलन सुरू होऊन तीन दिवस उलटले तरीही तालुक्यातील महसूल विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी फिरकलेला नाही. प्रशासनाच्या या अत्यंत उदासीन आणि संतापजनक भूमिकेमुळे आंदोलनस्थळी तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचा खरपूस समाचार घेत बहुजन समाज पार्टीचे (बसपा) जिल्हा महासचिव दीपक जाधव यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. "आज तीन दिवस होऊन गेले तरी महसूलचा एकही अधिकारी इथे फिरकला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशासन एवढ्या कुठच्या महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे की त्यांना उपोषणकर्त्यांना भेटायला आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायला वेळ नाही?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी राजकीय पुढाऱ्यांवरही कडाडून टीका केली. "एरव्ही मते मागण्यासाठी दहा-दहा वेळा मतदारांच्या दारावर येणारे पुढारी आता कुठे लपून बसले आहेत? की ते फक्त पुढच्या निवडणुकीचीच वाट बघत आहेत?" असा टोला त्यांनी लगावला. ख्रिस्ती बांधवांच्या उपोषणाकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत खंत व्यक्त करत, "आम्ही अल्पसंख्यांक असल्यामुळे आम्हाला या देशात न्याय मिळणार की नाही, हे तरी प्रशासनाने एकदाचे जाहीर करावे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

दीपक जाधव यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने या आंदोलनाची त्वरित दखल घेतली नाही आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर बसपा शांत बसणार नाही. या अन्यायाविरोधात ते स्वतः प्रत्यक्ष आंदोलनात उतरतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधणार की आंदोलन अधिक चिघळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg