loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत कोळंबे येथे कृषी दिन साजरा

वार्ता - दिनांक १ जुलै २०२६ महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ दापोली, उद्यान विद्या महाविद्यालय, दापोली यांच्या RHWE कृषी मित्र ग्रुप कोळंबे याकडून महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना RHWE ग्रुपचा विद्यार्थी जय इंगळे याने केली. तसेच कोकण कृषी विद्यापीठ प्रकाशित फळ झाडांच्या व पाले भाज्यांच्या संकरित वाणांची ओळख व माहिती नंदकुमार सातपुते व शुभम आग्रे याने दिली. त्याचबरोबर सेंद्रिय शेती चे फायदे व रासायनिक खतांचा दुष्परिणाम या बद्दल ग्रामस्थांना माहिती श्रेयस गुरव याने दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच लखीबाग मॉडेल शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. कमी जागेत जास्त उत्पन्न हा लखीबाग मॉडेल पाठीमागचा उद्देश शेतकऱ्यांना पटवून ऋषिकेश सलगर याने दिला. ग्रामस्थांना कोळंबे ग्रामपंचायत मार्फत नारळ वृक्षांची वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती - कोळंबे ग्रामपंचायत प्रशासक प्रशांत पाटील, उपसरपंच रविंद भातडे, ग्रामविकास अधिकारी जानवी शिंदे, माजी उपसरपंच हेमंत पवार, तंटामुक्ति समिती अध्यक्ष अजित हातिसकर, प्रगतशील शेतकरी प्रशांत फडणीस, कृषी मित्र ग्रुप कोळंबे (RHWE) समस्त शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg