loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड, अध्यक्षपदी स्नेहल रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड निवड करण्यात आली. अध्यक्षपदी स्नेहल रावराणे, सचिवपदी दिनकर केळकर तर खजिनदारपदी नेहा रावराणे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर क्लबच्या सदस्यांनी नव्या नेतृत्वाचे स्वागत करून त्यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी अध्यक्ष Rtn. सचिन रावराणे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने गेल्या काही वर्षांत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली असून, नवीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली क्लब सेवा, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

रोटरी वर्ष 2025–26 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्य करताना सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच, क्लबच्या सर्व सदस्यांनी एकदिलाने नवीन पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अधिकाधिक समाजोपयोगी प्रकल्प राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. (स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ) या ब्रीदवाक्यानुसार रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास आणि सामाजिक सेवेशी संबंधित विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg