दापोली (प्रतिनिधी) : कृषी विभाग पंचायत समिती दापोलीच्या वतीने कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या साकुर्डे येथील शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. त्यामुळे पंचायत समितीच्या कृषी विभागाचा शेतकरी मेळावा आणि त्या निमित्ताने आयोजित केलेला कृषीदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार तर पडलाच शिवाय चांगलाच सफलही झाला. कृषि दिन हा आपल्या कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे एक महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल १ जुलै हा दरवर्षी महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अशाच प्रकारे हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त बुधवारी १ जुलै रोजी दापोली पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील जिल्हा परिषद शाळा साकुर्डे नं . २ या शाळेत दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा कार्यक्रम पार पडला.
या कृषी दिनाच्या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, उपसभापती नम्रता तोडणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, संदिप चिखले, नरेश घरटकर, राजेंद्र फणसे, श्रीराम इदाते, सुवर्णा खळे, ममता शिंदे, सुचिता महाडिक, अंकिता घुबडे, तुळसा जाधव, जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी शेडगे, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, ऐश्वर्या धाडवे, नितीन दुर्गवले, माजी सभापती शांताराम पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहीणी दळवी, माजी अध्यक्ष शांताराम जाधव, माजी कृषी आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय समिती सभापती रेश्मा झगडे, माजी सभापती गितांजली वेदपाठक, पंचायत समितीच्या कृषी अधिकारी जयश्री रेवाळे, कृषी विस्तार अधिकारी दिनेश राणे, भरत भुसारे, तेजश्री कांबळे, तालूका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, साकुर्डे पोलिस पाटील श्रीकांत बैकर, संदिप जोशी, संदिप बांद्रे, शांताराम राजे, रविंद्र नटे, जयेश गोठल, मिलिंद मर्चंडे, जयेंद्र राजे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्यात सर्वत्र १ जुलै हा कृषी दिन साजरा केला जातो. तसेच कृषि दिनानिमित्ताने अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण, ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक', 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत यावेळी रक्तचंदन या दुर्मिळ वनस्पतीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.






















































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.