दापोली (सागर गोवळे) - ६७ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा नुकताच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून सहभागी झालेल्या लांजा येथील 'अमोल रंगयात्री' संस्थेच्या 'ईठ्ठला' या नाटकाने आपल्या अभिनयाची आणि कलात्मकतेची चुणूक दाखवत अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. 'ईठ्ठला' नाटकाला स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला असून, इतर तांत्रिक विभागांतही संस्थेने घवघवीत यश मिळवले आहे. यात दिग्दर्शन द्वितीय पुरस्कारासाठी अमोल रेडीज, रंगभूषा द्वितीयसाठी गजानन पांचाळ, पार्श्वसंगीतासाठी प्रदीप कांबळे व महेश बामणे, प्रकाश योजनेसाठी दयानंद चव्हाण, वेशभूषेसाठी संतोष डोर्लेकर व दामिनी भिंगार्डे, तर नेपथ्यासाठी संदीप सावंत व शरद चव्हाण यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच अमोल रेडीज व अर्चना पांचाळ यांना अभिनयाची प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला 'अमोल रंगयात्री'चे निर्माते जयू शेठ पाखरे, शरद चव्हाण, राकेश दळवी, अमित जाधव, अर्चना पांचाळ, संतोष डोर्लेकर आणि बबन कशेळकर हे उपस्थित होते. 'अमोल रंगयात्री' संस्थेच्या नाटकांची प्राथमिक फेरीत पारितोषिक मिळवण्याची परंपरा यापूर्वीही कायम राहिली आहे. विशेष म्हणजे २०१२ साली संस्थेच्या 'जिहाद' या नाटकाने अंतिम फेरीत पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला होता. ही कामगिरी त्या काळातील कोकणातील एक ऐतिहासिक उपलब्धी मानली जाते. 'ईठ्ठला' नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यासंदर्भात बोलताना लेखक-दिग्दर्शक अमोल रेडीज म्हणाले की, "रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सूचनेनुसार नाटकात काही आवश्यक बदल करून, लवकरच नवीन नावाने याचे प्रयोग प्रेक्षकांसाठी सादर केले जातील." या नाटकाच्या यशात डॉ. भगवान नारकर, शशांक उपशेटे, विजय शिंदे, दामिनी भिंगार्डे, संसारे, जयू कुडतरकर, पियुष कुडतरकर, सायली सुर्वे, प्रदीप माजळकर, विकास चव्हाण, अनघा देवस्थळी आणि मृदुंगमणि गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.






















































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.