loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारमाठचे उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांना राज्याचा प्रतिष्ठेचा 'उद्यान पंडित' पुरस्कार

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतिशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर आणि त्यांचे वडील आबा फोंडेकर यांना महाराष्ट्र शासनाचा फलोत्पादन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा 'उद्यान पंडित' पुरस्कार कृषीदिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच मृदा व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन फोंडेकर पिता-पुत्रांचा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यात सर्वप्रथम पाच वेळा हापूस आंब्याची पेटी बाजारात दाखल करण्याचा मान, 'वसंतसम्राट' या नव्या आंबा जातीची निर्मिती तसेच जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या लाल शेवग्याच्या संशोधन व लागवडीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची या सर्वोच्च राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना उत्तम फोंडेकर यांनी या यशाचे श्रेय वडील आबा फोंडेकर यांच्या अथक परिश्रमांना, दूरदृष्टीला आणि कल्पकतेला दिले. तसेच देवगड आणि मालवण परिसरातील आंबा बागायतदारांचे मार्गदर्शन, सहकार्य, प्रेरणा आणि आशीर्वाद यांमुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

"राज्यपालांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असून, महाराष्ट्र शासनाचे मी मनःपूर्वक आभार मानतो," असेही उत्तम फोंडेकर यांनी यावेळी सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून फोंडेकर पिता-पुत्रांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg