loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे तर्फे फुणगुस गावात पुराचे पाणी शेतात; अनेक शेतकरी बाधित

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस गावात नदीचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी तात्काळ पूरग्रस्त भागाला भेट देत नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या ४८ तासांतील संततधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. पुराचे पाणी शेतांमध्ये साचल्याने नुकतीच करण्यात आलेली भातलागवड धोक्यात आली असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. वर्षभराच्या मेहनतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. यावेळी शर्वरी वेल्ये म्हणाल्या, अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान अत्यंत दुर्दैवी आहे. या कठीण काळात आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी आहोत. महसूल व कृषी विभागाने कोणताही विलंब न करता तातडीने संयुक्त पंचनामे करून शासनाची मदत मिळवून द्यावी.

टाईम्स स्पेशल

तसेच बाधित शेतकर्‍यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी व शेतकर्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाहणी दौर्‍यावेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे झालेल्या या नुकसानीनंतर आता पूरग्रस्त शेतकर्‍यांचे लक्ष शासनाच्या मदत व भरपाईकडे लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg