loader
Breaking News
Breaking News
Foto

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे वृक्षारोपणाने ‘कृषि दिन’ साजरा

रत्नागिरी : आपल्या देशामध्ये हरितक्रांती सन १९६० च्या दशकामध्ये झाली. देशाची ५२% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्र मध्ये हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त दरवर्षी १ जुलै रोजी ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा करण्यात येतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे दिनांक १ जुलै २०२६ रोजी ‘कै. वसंतराव नाईक’ यांची जयंती साजरी करण्यात आली. संशोधन केंद्र प्रमुख, डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी ‘वसंतराव नाईक’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. केतन चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक द्रष्टे नेते होते. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीला आणि शेतकऱ्यांच्या हाताला ओळख दिली. त्यांनी मांडलेले "शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे" हे केवळ वाक्य नव्हते, तर त्यांच्या धोरणांचा तो केंद्रबिंदू होता. कृषी दिन साजरा करताना आपल्याला हेही समजून घ्यावे लागेल की, बदलत्या काळानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि बाजारपेठेतील आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धित उत्पादने यांकडे वळणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

आजच्या या दिनी, आपण सर्वांनी एक शपथ घेऊया की, ज्या ध्येयाने वसंतराव नाईक यांनी शेती आणि शेतकऱ्यांची सेवा केली, त्याच भावनेने आपणही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करूया आणि महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात अधिक समृद्ध करूया. त्यानंतर शासन निर्देशानुसार ‘कृषि सप्ताह’ निमित्त विशेष ‘वृक्षारोपण’ मोहीम राबविण्यात आली. सदर ‘कृषि सप्ताह’ दिनांक १ ते ७ जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ झाडगाव तसेच पेठ्किल्ला येथील प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg