पनवेल :- खारघर वसाहतीमधील सेक्टर-7 परिसरात महानगर गॅस कंपनीकडून भूमिगत गॅस वाहिनी टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी झाली. त्याचवेळी स्कूल बस रस्त्यावरील खड्ड्यात अडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. फेज -1 परिसरात महानगर गॅस कंपनीकडून अनेक दिवसांपासून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, काही ठिकाणी खड्डे उघडेच असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घटनेदरम्यान शाळेची बस खड्ड्यात अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक संथ झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची योग्य दुरुस्ती होत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, खोदकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तातडीने पूर्ववत करावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
















































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.