loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे पवारकोंड येथे दोन बसमध्ये जोरदार धडक, भावेआडोम येथील १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी - रत्नागिरी : मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातात एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भावेआडोम येथून रत्नागिरीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस फणसवले येथे आली असता दुसर्‍या बसशी तिची जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली. आपल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती.

टाईम्स स्पेशल

या अपघातात सुजल सनगरे (१७, पटवर्धन कॉलेज), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती सत्यवान कांबळे (१७), तेजस्विनी अशोक खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) यांच्यासह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. सर्व जखमी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अपघात माहिती मिळाल्यावर सेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, सरपंच कैलास तांबे, रत्नदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा गावडे, कैलास तांबे, वैभव पाटील यांनी घटनास्थळी जावून तत्काल विद्यार्थी विद्यार्थीनींना उपचारासाठी नेण्यास सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg