loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध ,मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर

गेल्या काही दिवसांपासून आनंद परांजपे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. 14 मे रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्या होत्या. विशेष म्हणजे, विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचा कयास लावला जात होता. राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांनी अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला. ते शिवसेनेत जाताच आता सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, असे म्हटल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या पत्रावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg