loader
Breaking News
Breaking News
Foto

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ हे गीत लाखो मुलांपर्यंत पाहोचविणार्‍या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणकर यांचे निधन

भारतीय संगीतविश्वावर अनेक दशके आपल्या अवीट, मधुर आणि भावस्पर्शी स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी दुःखद निधन झाले. भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपटसंगीत या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य मानलं जातं. त्यांच्या निधनानंतर कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. २८ जानेवारी १९३७ रोजी तत्कालीन अविभाजित भारतातील भवानीपूर (आताचा बांगलादेश) येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या सुमनताईंनी संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. त्यांचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असल्याने सुरुवातीच्या काळात त्या ‘सुमन हेमाडी’ या नावाने गायन करत होत्या. संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास एका सार्वजनिक कार्यक्रमातून सुरू झाला. एका कार्यक्रमात त्यांचे गायन ऐकून ज्येष्ठ गायक तलत महमूद प्रभावित झाले. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी त्यांना गाण्याची संधी दिली आणि तिथूनच सुमन कल्याणपूर यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली.

टाईम्स स्पेशल

मराठी संगीत क्षेत्रातही त्यांनी अनेक अजरामर गीते दिली. विशेषतः भावगीतांच्या माध्यमातून त्यांनी घराघरांत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुमन कल्याणपूर यांनी मराठी आणि हिंदीसह बंगाली, पंजाबी, उडिया, भोजपुरी, राजस्थानी आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी, भक्तीगीत आणि चित्रपटगीत या सर्वच प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडली. त्यांच्या गायकीतील शास्त्रीयतेचा ठसा कायम जाणवत असे. त्यांनी गायलेल्या “मन मोहन मन में हो तुम्ही” या गीताला प्रतिष्ठेचा तानसेन पुरस्कार मिळाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg