loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी! पंजाबमध्ये 'आप'च्या वादळात भाजपला मोठा धक्का , स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 680 जागांवर विजय

पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपचं वादळ आल्याचं पहायला मिळत आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला आहे. तर काँग्रेस आणि आकाली दलाचा देखील मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालावरून स्पष्ट झालं आहे की, अजूनही पंजाबमध्ये आपची जादू कायम आहे. हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. ज्यामध्ये आठ महानगर पालिका, 75 नगर परिषद आणि 20 नगर पंचायतींच्या निवडणुकीचा समावेश होता. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 पेक्षा अधिक जागांवर आपचे उमेदवार विजय झाले आहेत. तर भाजपला अवघ्या 52 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg