loader
Breaking News
Breaking News
Foto

जगण्याचा संघर्ष! उन्हातान्हात बसून गावठी भाजी विकणाऱ्या 'त्या' निरागस आजींची संघर्षगाथा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात, वाऱ्या-पावसात रस्त्याच्या कडेला बसून गावठी भाजीपाला आणि नारळ विकत आपल्या रोजीरोटीसाठी खटपट करणाऱ्या कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत खडतर असते. याच संघर्षात थकून कधीकधी ते शेजारीच आडोशाला थोडे अंग टेकतात. अशावेळी त्यांच्या जगण्याचा एकमेव आधारवड ठरतो तो म्हणजे त्यांच्याकडे येणारा ग्राहक!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​दररोज सकाळी सात वाजता ग्रामीण भागातून अशा अनेक कष्टकरी महिला आणि वृद्ध आजी सावंतवाडी बाजारपेठेमध्ये येतात. हिवाळा, उन्हाळा की पावसाळा... निसर्गाच्या कोणत्याही चक्राची तमा न बाळगता, केवळ आपला जीव जगवण्यासाठी त्या रस्त्याकडेला आपल्या वस्तू मांडून बसतात. समोर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या किरकोळ चार वस्तू दिसतात, पण त्या विकल्या जाईपर्यंत अख्खा दिवस मावळून जातो. दिवसभराच्या या अथक परिश्रमानंतर त्यांच्या हाती किती पडतात? तर अवघे शंभर ते दोनशे रुपये! परंतु, एका दिवसाची भूक भागवण्यासाठी आणि जगण्यासाठी त्यांना हाच एवढाच काय तो आधार असतो. ​त्या वृद्ध शरीरालाही आरोग्याचे आजार असतील, मनात नानाविध टेन्शन आणि विचारांचे काहूर असेल. पण या सर्व संकटांना तोंड देता देता थकलेले ते निरागस शरीर जेव्हा थकव्यापोटी क्षणभर विश्रांती घेते, तेव्हा ते पाहून 'आपण किती सुखी आहोत' याची जाणीव प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही.

टाइम्स स्पेशल

​"जगणं कठीण वाटत असेल, तर या आजींकडे पहा..." ​आजच्या काळात जर कोणाला वाटत असेल की या जगात मरण खूप सोपे आहे आणि जगणे फार कठीण, तर त्यांनी या निरागस वृद्ध आजींकडे क्षणभर पाहावे. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डोळ्यांतील प्रामाणिक कष्ट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या जगण्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. ​आजकाल आपण सोशल मीडिया किंवा टीव्हीवर पाहतो की, शहरांमध्ये असेच जीवन जगणारे अनेक युवक, महिला आणि वृद्ध लोक आपल्या पोटासाठी धडपडत असतात. अनेकदा पालिकेच्या कारवाईत त्यांचे छोटेमोठे संसार उद्ध्वस्त होतात, तरीही ते कष्ट करून जगणे सोडत नाहीत. ​"कधीतरी मी देखील या व्यवस्थेला बळी पडलो होतो. पण, जनतेच्या आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादामुळे मी यातून तरलो. आज अशा पद्धतीने प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या आपल्या गावातील कष्टकरी आणि निराधार वृद्ध आजींना 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान' भविष्यात त्यांचा खंबीर आधारवड बनून सावली देईल," असा ठाम विश्वास प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सामाजिक बांधिलकी' ठरणार आधारवड

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg