ठाणे (अमोल पवार) - ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदावर बुधवारी (ता.२७) डॉ. विनयकुमार राठोड, यांनी पदाभार स्वीकारल्यावर अवघ्या ४८ तासात अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन दोघा आरोपीना अटक केली. ठाणे ग्रामीण नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक यांनी पदाचा पदाभार स्वीकारल्यावर खुनाच्या प्रकरणात दोघा आरोपींना बेड्या ठोकून कारवाई केली. या कारवाईने ठाणे ग्रामीण विभागाला गेल्या अनेक वर्षांनी एक सिंघम ग्रामीण अधिक्षक अधिकारी मिळाल्याने ग्रामीण पोलिसांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. यापूर्वी डॉ. विनयकुमार राठोड, हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक असताना त्यांनी संभाजीनगर ग्रामीणमध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर त्यांनी कडक कारवाई केली तसेच, नायलॉन मांजासारख्या घातक वस्तूंच्या वापराविरोधात त्यांनी विशेष जनजागृती मोहीम राबविणारे होती. पोलीस क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन: त्यांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राने महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत तब्बल ४७ पदके मिळवून उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांच्या कार्याची गृहखात्यात चर्चा सुरू होती. बुधवारी २७ मे २०२६ रोजी शहापूर तालुक्यातील दहागावाच्या हद्दीतील मोकळ्या मैदानाच्या बाजुस असलेल्या शेतात कुजलेल्या स्थितीत हात, पाय, डोळे बांधलेले व अंगावर ठिक ठिकाणी वार असलेला एक अनोळखी पुरुषाचा मृत देह मिळुन आल्याने अज्ञात इसमाविरुध्द वाशिंद पोलीस ठाण्यात कलम १०३ (१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नवनिर्वाचित ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, डॉ. विनयकुमार राठोड, यांनी याच दिवशी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन डॉ. राठोड यांनी तातकाळ गुन्हयांचे घटनास्थळी भेट दिली. व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, संदिप गिते यांना सदर गुन्हयांचे अनुषंगाने तपासकामी वेगवेगळी पथक तयार करुन गुन्हयांचा समांतर तपास करुन लवकरात लवकर गुन्हा उघकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक संदीप गिते, स्थानिक गुन्हे शाखा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी व लगतच्या जिल्हयातील मनुष्य मिसींग व अपहरणाच्या गुन्हयांची माहिती गोळा करणे करीता रवाना केली. तपास पथकाने मयताच्या वर्णनाशी मिळती जुळते वर्णन असलेल्या मिसींग वेगळ्या काढुन सदर माहितीचे तांत्रीक विश्लेषन केले. तसेच मयत व्यक्तीची चप्पल, अंगावरील कपडे यावरुन साकीनाका पोलीस ठाणे येथे मंगळवारी (ता.२६) येथे मिसींग इसम नामे शमशाद अली वारीश अली ( ३५) रा. काजुपाडा, कुर्ला (प) अशी असल्याची ओळखली पटली. मयत हे टेलरिंगचे काम करत होते. तांत्रीक विश्लेषणावरुन आरोपीत सय्यद हसन सय्यद मेहबुब बादशहा, (३८ ), रा. मुंब्रा ठाणे व आरोपीत समीर अब्दुल करीम कल्याणकर, (४३) रा. माहिम, मुंबई यांचेवर संशय बळावल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता, मयत शमशाद अली वारीश अली याने आरोपी सय्यद हसन सय्यद मेहबुब बादशहा यास टप्याटप्याने २ लाख ७० हजार उसने पैसे घेतले होते.
आरोपी सय्यद हसन याचा जरीच्या धाग्यांचा व्यवसाय होता. दीड वर्ष झाले तरीही सदरचे पैसे मयत शमशाद यास सय्यद हसन परत देत नसल्याने मयत आरोपीताकडे पैशाचा तगादा लावत होता. त्याचा आरोपी सय्यद हसन यास राग येवुन त्याने जोडीदार आरोपी समीर अब्दुल करीम कल्याणकर( ४३) याच्या मदतीने मयत शमशाद अली यास शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे दहागाव, येथे फुस लावुन आणले व त्याचे हात, पाय, बांधुन धारदार हत्याराने त्याचा निर्घुण खुन केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. अशी माहिती ठाणे पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सदर कारवाई ठाणे पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, ठाणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गिते, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचे नेतृत्वात पोउनि महेश कदम, पोउनि रोहन शेलार, पोउनि भाऊसाहेब गायकवाड, सफौ प्रकाश साईल, सफौ धनाजी कडव, पोहवा संतोष सुर्वे, पोहवा गोविंद कोळी, पोहवा उमेश ठाकरे, पोहवा हनुमान गायकर, पोहवा सतिष कोळी, पोहवा हेमंत विभुते, पोहवा संदीप तांडेल, पोहवा शशिकांत पाटील, पोहवा दिपक गायकवाड, पोहवा रविंद्र मोरे, पोना योगेश शेळकंदे, पोना जितेंद्र बारके, पोशि स्वप्नील बोडके, पोशि सुरेश धिंदळे सर्व नेमणुक स्थागुशा या पथकाने अहो रात्रौ अथक परिश्रम घेवुन कोणतेही धागे-दोरे नसतांना ४८ तासाच्या आता गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगीरी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास वाशिंद पोलिस ठाण्यांचे सपोनि गोविंद पाटील हे करीत आहेत.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.