loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून निवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान

रत्नागिरी :पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास सेवानिवृत्त होणारे पोउनि/ गजानन बने, श्रेणी पोउनि भरत जाधव, नारायण सावंत, नारायण आळे, जयवंत सोनावले, नितीन पंदेरे, सुनिल आयरे, सपोफौ/ विनायक जाधव तसेच सहा. आचारी/ भारती वाडकर आणि सफाईगार/ शशिकांत पडयाळ हे आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. तसेच तेलंगणा राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी श्री. चेतन नितीन पंदेरे (भा.पो.से.) हे त्यांचे वडील श्रेणी पोउनि नितीन पंदेरे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रसंगी रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg