loader
Breaking News
Breaking News
Foto

आंगणेवाडी येथील निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ मालवण विजेता

मालवण (प्रतिनिधी) - आंगणेवाडी विकास मंडळ आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेमध्ये जय गणेश महिला कबड्डी संघ मालवण यांनी विजेतेपद तर उपविजेतेपद आंगणेवाडी महिला कबड्डी संघाने पटकावले. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक एस. ए. फाउंडेशन महिला कबड्डी संघ मालवण तर चतुर्थ क्रमांक यंग स्टार महिला कबड्डी संघ कणकवली यांची निवड करण्यात आली. यशस्वी सर्व संघाना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ही स्पर्धा निमंत्रित महिला संघांची घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विनिता साठे आंगणेवाडी संघ, साक्षी निकम यंग स्टार कणकवली, रिद्धी हडकर जय गणेश मालवण, दुर्वा राणे एस. ए. फाउंडेशन मालवण या खेळाडूंची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. सर्वांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंकज राणे, प्रथमेश आढाव, प्रियंका कोरगावकर, महेश सावंत, हरिश्चंद्र साळुंखे, नितीन हडकर, सुरज परब यांनी काम पाहिले. ही स्पर्धा मॅटवर घेण्यात आली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी आंगणेवाडी विकास मंडळ आंगणेवाडी चे सचिव काका आंगणे, अनंत आंगणे, विद्या अंगणे, सिताराम उर्फ बाळा आंगणे, गजानन आंगणे, दत्तप्रसाद पेडणेकर, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू भरत आंगणे, सचिन आंगणे, तुषार आंगणे, बाळा आंगणे, तनुराज आंगणे, सोमा आंगणे, कुणाल आंगणे, प्रतीक आंगणे, रोहित आंगणे, सागर आंगणे, प्रथमेश आंगणे, दिनेश आंगणे, देवा आंगणे, तन्मय आंगणे, गणेश आंगणे, गोविंद आंगणे, दीपक आंगणे, सागर आंगणे, प्रमोद आंगणे, सुधीर आंगणे, विशाल आंगणे, भास्कर आंगणे, बाबा आंगणे, सतीश आंगणे, समीर आंगणे, राजू आंगणे आणि आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्यकर्ते, आंगणेवाडी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आंगणेवाडी विकास मंडळाचे सचिव काका आंगणे यांनी आंगणेवाडीमध्ये आजच्या या निमंत्रित महिलांच्या कबड्डी स्पर्धेमुळे या सर्वांना पुढे जाण्यासाठी कौतुकाची थाप मिळाली आहे. यापुढे आंगणेवाडीमध्ये कबड्डी स्पर्धे सहित विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध खेळातील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आंगणेवाडी कुटुंबीय आणि आंगणेवाडी विकास मंडळाचा नेहमीच प्रयत्न राहील, असे सांगितले. सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले. जय गणेश मालवण संघाची खेळाडू रिद्धी नितीन हडकर हिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य दाखविल्याबद्दल आंगणेवाडी येथे तिचा अनंत आंगणे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या निमंत्रित स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा आंगणेवाडी ग्रामस्थांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील सर्व खेळाडूंची आणि संघ व्यवस्थापकांची मोफत भोजन व्यवस्था आंगणेवाडी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg