loader
Breaking News
Breaking News
Foto

तिसंगी येथे दारुबंदी कारवाई: पोलिसांची हातभट्टीवर धाड

खेड - खेड तालुक्यातील तिसंगी येथे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉस्टेबल नितीन चव्हाण यांनी मौजे तिसंगी येथील डुबी नदीकिनाऱ्यावरील झाडीत धाड टाकली. तेथे विशाल जयंत भोसले (वय ४१) हा बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू गाळताना आणि विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवलेला आढळला. पोलिसांनी तेथून ६३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये २५०० रुपयांचे अ‍ॅल्युमिनियमचे भांडे, १५०० रुपयांचा बॉयलर (१० लिटर उकळत्या रसायनासह), ७००० रुपयांचे दोन कॅन (७० लिटर गावठी दारू) आणि ५२,५०० रुपये किमतीच्या ५०० लिटर क्षमतेच्या ३ प्लास्टिक टाक्या (१५०० लिटर कुजके रसायन) व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ब) (क) (ड) (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg